IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद, शकिबला मिळाली विकेट

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs BAN T20 WC 2024 Super 8 Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद, शकिबला मिळाली विकेट
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील 47 वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा सातवा सामना आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडू पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर रोहित शर्मा 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 42/1.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2024 08:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).