IND W vs ENG W: भारताने पहिल्या वनडेत इंग्लंडचा केला पराभव, मंधानाचे शतक हुकले, हरमनप्रीत आणि यास्तिकाचे अर्धशतक

डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

women's cricket team (Photo Credit - Twitter)

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला विजयाने सुरुवात केली. त्यांनी होव्ह येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याआधी टी-20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement