IND Qualify For Semifinal of ICC T20 World Cup 2024: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उपांत्य फेरीत मारली धडक, 27 जूनला इंग्लंडसोबत होणार लढत
आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 205 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मान निडर होत 92 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि स्टाइनिसला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 186 धावा करु शकला. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक तीन विकेट घेतला. तर, ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड 76 सर्वाधिक धावा केल्या. आता भारताचा सामना सेमीफायनलमध्ये इंग्लडसोबत 27 जूनला होणार आहे.
WT20 2024. India Won by 24 Run(s) https://t.co/VN07Z4nKQO #T20WorldCup #AUSvIND
— BCCI (@BCCI) June 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2024 11:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

