IND W vs SL W 1st ODI 2025 Live Toss & Scorecard: भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली, श्रीलंका प्रथम फलंदाजी करणार; लाइव्ह स्कोअरकार्ड येथे पहा

महिला तिरंगी मालिका 2025 च्या पहिल्या सामन्यात, भारत महिला संघाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात, पावसामुळे खेळ प्रती डाव 39 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.

IND W vs SL W 1st ODI 2025 Live Toss & Scorecard: भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली, श्रीलंका प्रथम फलंदाजी करणार; लाइव्ह स्कोअरकार्ड येथे पहा
PC-X

Sri Lanka Women National Cricket Team vs India Women National Cricket Team Match Scorecard: श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ एकदिवसीय तिरंगी मालिकेचा पहिला सामना 27 एप्रिल (रविवार) रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. महिला तिरंगी मालिका 2025 च्या पहिल्या सामन्यात, भारत महिला संघाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसामुळे खेळ प्रति डाव 39 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका महिला संघाची कर्णधार चामारी अटापट्टूने फलंदाजीची जबाबदारी स्वीकारली आहे. भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. ज्यामध्ये प्रतीका रावल आणि नल्लापुरेड्डी चर्नी सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे, श्रीलंकेने देखील त्यांच्या अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या संयोजनासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड येथे पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2025 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).