IND-W vs NZ-W Series 2022: भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल, वेळेवर सुरू होणार नाही वनडे मालिका

IND-W vs NZ-W Series 2022: न्यूझीलंड क्रिकेटने भारतीय महिला संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकात काही किरकोळ बदल केले आहेत. भारत त्यांच्या दौऱ्याची सुरुवात 9 फेब्रुवारीला टी-20 सामन्याने करेल. तर पहिला वनडे सामना 11 फेब्रुवारी रोजी सुरू होण्याची अपेक्षा होती, त्यानंतर दुसरा (14 फेब्रुवारी) व तिसरा (16 फेब्रुवारी) व 22 आणि 24 तारखेला शेवटचे दोन सामने होणार आहेत.

भारत महिला टीम (Photo Credit: PTI)

IND-W vs NZ-W Series 2022: न्यूझीलंड क्रिकेटने (New Zealand Cricket) भारतीय महिला संघाच्या (India Women's Team) न्यूझीलंड दौऱ्याच्या वेळापत्रकात काही किरकोळ बदल केले आहेत. भारत त्यांच्या दौऱ्याची सुरुवात 9 फेब्रुवारीला क्वीन्सटाउन येथे व्हाईट फर्न्स (White Ferns) विरुद्ध टी-20 सामन्याने करेल. तर पहिला एकदिवसीय सामना 11 फेब्रुवारीला सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंड क्रिकेटने पहिले तीन एकदिवसीय सामने एक किंवा दोन दिवस पुढे ढकलले असून अखेरचे दोन सामने वेळापत्रकानुसार होतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement