IND W vs BAN W, World Cup 2022: चांगल्या सुरुवातीनंतर भारताची फलंदाजी गडगडली, अवघ्या पाच चेंडूत तीन विकेट गमावल्या (Watch Video)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी महिला विश्वचषक सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण पाच चेंडूंतच टीम इंडिया बॅकफूटवर गेला. पाच चेंडूंतच भारताने स्मृती, शेफाली आणि मिताली राज यांच्या विकेट्स गमावल्या. स्मृती 30 धावा करून बाद झाली, तर शेफाली वर्मा 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली.
IND vs BAN Women's World Cup: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण पाच चेंडूंतच भारतीय संघ बॅकफूटवर गेला. पाच चेंडूंतच भारताने स्मृती, शेफाली आणि मिताली राज (Mithali Raj) यांच्या विकेट्स गमावल्या. स्मृती 30 धावा करून बाद झाली, तर शेफाली वर्मा 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली. यानंतर कर्णधार मिताली राज गोल्डन डकवर बाद झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)