IND vs WI, Women's World Cup 2022: स्मृती मंधाना हीच मास्टर-क्लास! हरमनप्रीत कौर हिच्यासोबत शेअर केली सामनावीरची ट्रॉफी; म्हणाली - ‘आम्ही दोघी पात्र आहोत’

Women's World Cup 2022: भारताची महिला सलामीवीर स्मृती मंधाना हिने अनुकरणीय खेळाडू भावना दाखवून तिची उपकर्णधार आणि सहकारी शतकवीर हरमनप्रीत कौर सोबत तिची ‘सामनावीर’ची ट्रॉफी शेअर केली. उल्लेखनीय म्हणजे, मंधाना आणि हरमनप्रीतच्या विक्रमी 184 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 317/8 पर्यंत मजल मारली आणि अष्टपैलू गोलंदाजीने वेस्ट इंडिजला प्रत्युत्तरात 162 धावांवर रोखले.

हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना (Photo Credit: Twitter/BCCIWomen)

IND vs WI, Women's World Cup 2022: स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने तिची 'प्लेअर ऑफ द अवॉर्ड' ट्रॉफी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सोबत शेअर केली. मिताली राज हिच्या टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिज महिला (West Indies Women) संघाविरुद्ध ग्रुप स्टेजमधील विक्रमी 155 धावांनी विजय मिळवला. स्मृती आणि हरमनप्रीतने 184 धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला तीनशे पार धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. यावर प्रतिक्रिया देत मंधाना म्हणाली की त्या दोघी या पुराकाराच्या पात्र आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now