IND vs WI 3rd ODI Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कसे आणि कुठे पाहणार?

IND vs WI 3rd ODI Live Streaming: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजचा तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात 44 धावांनी जबरदस्त मिळवून रोहित शर्माच्या भारतीय संघाने सामन्यासह मालिका खिशात घातली. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा वनडे सामना लाइव्ह कुठे आणि कसा पाहणार याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI Live Streaming: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज, शुक्रवारी होणार आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) खेळाडूंना आपला ठसा उमटवण्याची ही शेवटची संधी आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1:00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि Disney + Hotstar अ‍ॅपवर देखील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement