IND vs WI 1st ODI: ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर यांना टीम इंडियाची श्रद्धांजली, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी 8.12 वाजता निधन झाले.

टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानात (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 1st ODI: सुप्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न श्री. लता मंगेशकर यांच्या निधनाला काही तासांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले की भारतीयसंघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात काळी पट्टी बांधून मैदानात उतरेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement