IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यातून Ishan Kishan ‘आऊट’, आता ओपनिंगसाठी रोहित शर्माला मिळणार कोणाची साथ?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यातून ईशान किशनला बाहेर पडला आहे. दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना लाहिरू कुमाराच्या चेंडूने यष्टीरक्षक-फलंदाजच्या डोक्याला मार लागला. अशा परिस्थितीत आता किशनच्या जागी तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सोबत सलामीला कोणता खेळाडू उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ऋतुराज गायकवाड यापूर्वी मालिकेतून बाहेर पडला आहे.

ईशान किशन (Photo Credit: Twitter/ICC)

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) रविवारी धर्मशाला (Dharmasala) येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri lanka) तिसऱ्या T20 सामन्यातून बाहेर पडला आहे. “एक टीम डॉक्टरांसह, त्याला काल रात्री स्थानिक रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले जेथे CT स्कॅन करण्यात आले. CT स्कॅनचे निष्कर्ष सामान्य आहेत. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवून राहील,” बीसीसीआयने निवेदनात म्हटले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement