IND vs SL: टीम इंडियासाठी मोठी बातमी, श्रीलंकेचा सर्वात मोठ्या धोकादायक खेळाडूची T20 मालिकेतून एक्झिट

IND vs SL: श्रीलंकेचा लेग-स्पिनर वानिंदु हसरंगा 24 फेब्रुवारीपासून लखनऊ येथे सुरु होणाऱ्या भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियातील श्रीलंकन संघातील तीन सदस्यांपैकी हसरंगा देखील कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला होता. 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने भारत गेल्या वर्षी जुलैमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत श्रीलंकेसाठी विशेषतः बॉलने छाप पडली होती.

वनिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

टीम इंडियाला (Team India) मोठा दिलासा आणि श्रीलंका (Sri Lanka) संघासाठी मोठा झटका ठरणारी बातमी समोर आली आहे. लंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोविड-19 मधून बरा न झाल्याने भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आठवडाभरापूर्वी ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान हसरंगाला कोविड-19 चे निदान झाले होते आणि ताज्या चाचणीतही तो पॉझिटिव्ह आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now