IND vs SL Asia Cup 2023 Live Score Update: नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, अक्षर पटेलला संधी

तर त्याच्याऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे.

आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत आज सामना होणार आहे. कालच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी विजय मिळवला होता त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढलेले असेल. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी शार्दुल ठाकुरला विश्रांती दिली आहे. तर त्याच्याऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या दोन षटकांत भारताच्या 10 धावा झाल्या आहेत.

भारताची प्लेइंग 11 -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.

पाहा पोस्ट -