IND vs SL 2nd Test: बंगळुरूच्या मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्मा दिग्गजांच्या पंक्तीत पटकावणार स्थान, पिंक-बॉल कसोटी ‘या’ कारणामुळे ठरणार विशेष

भारतीय कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध पिंक-बॉल कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी बंगळुरूच्या मैदानात पाऊल ठेवताच दिगजांच्या एलिट यादीत सामील होईल. रोहितच्या नेतृत्वात भारताने पाहुण्यांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि मोहालीतील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना मोठा पराभव केला. आणि आता दुसरा कसोटी सामना बेंगळुरू येथे होणार आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL 2nd Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना 12 मार्च रोजी बंगळुरू (Bangalore) येथे खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी हा सामना खास असणार आहे. गुलाबी चेंडूने (Pink-Ball) खेळला जाणारा हा कसोटी सामना रोहितच्या कारकिर्दीतील 400 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. यासह हिटमॅन सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंच्या खास क्लबमध्ये सामील होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement