IND vs SL 1st T20I: ‘पुष्पा फिव्हर सुरूच’, विकेट मिळाल्यावर रवींद्र जडेजा म्हणाला - ‘मै झुकूंगा नही’ (Watch Video)
IND vs SL 1st T20I: तेलगु चित्रपट ‘पुष्पा’ची जादू संपुर्ण जगभरात पसरली आहे. आणि भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या टी- सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा या खेळाडूचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो श्रीलंकेच्या दिनेश चंडिमलला बाद केल्यावर ‘मैं झुकेगा नहीं’ हा डायलॉग बोलताना ऐकू आला. चंडिमलला बाद केल्यानंतर जडेजाने सेलिब्रेशन करून मन जिंकले.
IND vs SL 1st T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या जुन्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. त्याने पाहुणा यष्टीरक्षक दिनेश चंडिमलला स्वीप शॉट खेळताना विकेटच्या आऊट केले. चंडीमल बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा जडेजाच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचे सेलिब्रेशन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. जडेजा मैदानातच “मै, झुकूंगा नही” डायलॅगनंतरची हुकस्टेप करताना दिसला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)