IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने 'करा या मरो' सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी केला पराभव, युझवेंद्र चहल-हर्षल पटेल यांनी केली शानदार गोलंदाजी
5 T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसर्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला आणि मालिकेत कायम राहिली. 5T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या. टीम इंडियासाठी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 131 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 29 धावा केल्या. टीम इंडियाकडून हर्षल पटेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना 17 जून रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)