IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

आफ्रिकी संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो-या मरो चा असेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यात आज पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे दुसरा आणि निर्णायक वनडे सामना रंगणार आहे. आफ्रिकी संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो-या मरो चा असेल. भारतीय वेळेनुसार दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1:30 वाजता होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर हिंदी-इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांमध्येही पाहू शकता. तर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)