IND vs NZ 3rd T20I: दीपक चाहरची दमदार फलंदाजी पाहून Rohit Sharma ने ठोकला कडक सलाम, पहा Video

यजमान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने फलंदाजीत चांगली सुरुवात केली, पण नियमित विकेट पडू लागल्याने भारतीय डाव गडगडला. पण शेवटी दीपक चाहरच्या छोटेखानी खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकली. त्याने या डावात एक षटकारही मारला, जो पाहून हिटमॅन त्याला सलाम करताना दिसला.

दीपक चाहरला रोहित शर्माचा सलाम (Photo Credit: Twitter)

खालच्या फळीतील फलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) रविवारी कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आणि मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजी करत भारताला 184 धावांची स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्यास मदत करण्यासाठी 8 चेंडूत नाबाद 21 धावा ठोकल्या. अ‍ॅडम मिल्नेने (Adam Milne) टाकलेल्या अंतिम षटकात भारतीय गोलंदाजाने कमालीचा षटकार मारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चाहरला सलाम करताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now