IND vs NZ 2nd Test: कमबॅक सामन्यात विराट कोहलीने जिंकला दुर्मिळ टॉस, Wasim Jaffer ने भन्नाट Meme शेअर करून घेतली फिरकी

भारताचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध छोट्या विश्रांतीनंतर कमबॅक केले. पावसाने बाधित दुसऱ्या कसोटीच्या सुरुवातीला ब्रेकनंतर वरिष्ठ राष्ट्रीय संघात परतताना विराटने नाणेफेक जिंकली. एक दुर्मिळ नाणेफेक जिंकून कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला असेल याबाबत भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने सोशल मीडियावर एक भन्नाट मिम शेअर करून त्याची फिरकी घेतली.

विराट कोहली (Photo Credit: ICC/Twitter)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर छोट्या विश्रांतीनंतर आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. कोहलीने दुर्मिळ अशी नाणेफेक जिंकल्यावर भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी एक भन्नाट मिम शेअर केली जी पाहून चाहते नक्कीच लोटपोट होतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement