IND vs NZ 2nd Test: विराट कोहलीने घडवला इतिहास, तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 विजयांची नोंद करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
विराट कोहलीने क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याच्यापूर्वी जगातील कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर 372 धावांनी मात करत मालिका 1-0 अशी खिशात घातली. खेळाडू म्हणून कोहलीचा हा कसोटीतील 50 वा विजय आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 विजय नोंदवणारा कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा (New Zealand) 372 धावांनी धुव्वा उडवला. खेळाडू म्हणून कोहलीचा हा कसोटीतील 50 वा विजय आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 विजय नोंदवणारा कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Congratulations @imVkohli. The first player with 50 international wins in each format of the game.#TeamIndia pic.twitter.com/51zC4hceku
— BCCI (@BCCI) December 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2021 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

