IND vs NZ 2nd Test: ‘तुम्ही इथे या, मी अंपायरिंग करतो’; अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर विराट कोहलीचा सुटला संयम (Watch Video)
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध यजमान टीम इंडियाने 372 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. हा सामना अंपायरिंगच्या दृष्टिकोनातून चांगला राहिला नाही आणि DRS मुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहली अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर भडकला आणि त्याने नंतर पंचांची खिल्ली उडवली.
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) सामना पुन्हा एकदा पंचांच्या खराब निर्णयामुळे गाजला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर भडकला आणि त्याने नंतर पंचांची खिल्ली उडवली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट अंपायरची खिल्ली उडवत म्हणतो, “हे लोक काय करतात यार? तुम्ही माझ्या जागी या, मी अम्पायरिंग कारेन.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)