IND vs NZ 2nd Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत घडला विचित्र विक्रम, 132 वर्षांत जे नाही झाले ते मुंबईत घडले

वानखेडे स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि टॉम लाथम अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंडचे नेतृत्व करत असल्यामुळे, दोन्ही संघांमधील ही मालिका 1889 पासूनची पहिली दोन कसोटी सामन्यांची मालिका बनली आहे ज्यामध्ये चार वेगवेगळ्या कर्णधारांचा समावेश आहे. इंग्लंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेल्या वेळी असे घडले होते.

विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) परतल्याने भारतीय संघात (Indian Team) काही बदल करण्यात आले आहेत. तसेच कोपऱ्याच्या दुखापतीमुळे केन विल्यमसन या सामन्यातून बाहेर पडला असल्यामुळे टॉम लाथमकडे (Tom Latham) किवी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. यासोबतच या सामन्यात एक अनोखा विक्रमही बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now