IND vs NZ 2nd Test Day 2: टीम इंडियाला सातवा झटका, दीडशतक करून Mayank Agarwal बनला एजाज पटेलच्या फिरकीचा शिकार

भारताविरुद्ध दुसऱ्या मुंबई कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलचा जबरदस्त फॉर्म सुरूच आहे. वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर एजाज पटेलने भारताला सातवा धक्का दिला आणि संयमाने किवी गोलंदाजांचा सामना करून 150 धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीर मयंक अग्रवालला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह एजाज पटेलने आतापर्यंत सर्व सात भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty)

एजाज पटेलने (Ajaz Patel) न्यूझीलंडला पुन्हा एकदा मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने भारतीय फलंदाज मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) यष्टीरक्षककडे झेलबाद करून भारताची सातवी विकेट घेतली. आतापर्यंत सर्व विकेट एजाजने घेतल्या आहेत. मयंकने 311 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकारांसह 150 धावांची खेळी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement