IND vs NZ 1st Test Day 5: रिद्धिमान साहा दुखापतीमुळे पुन्हा मैदानातून आऊट, पाचव्या दिवशी KS Bharat कडे विकेटकिपिंगची कमान
भारत आणि न्यूझीलंड संघात पहिला सामना कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी भारताकडून क्षेत्ररक्षणासाठी रिद्धिमान साहा ऐवजी श्रीकर भरत बदली यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला आहे. BCCI नुसार, “साहाच्या मानेत दुसऱ्या डावात यष्टीरक्षक करताना वेदना जाणवल्या. त्यामुळे यष्टीरक्षक करताना त्याच्या हालचालींवर परिणाम होत आहे.”
IND vs NZ 1st Test Day 5: भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघात पहिला सामना कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी सोमवार, 29 नोव्हेंबर रोजी भारताकडून क्षेत्ररक्षणासाठी रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) ऐवजी श्रीकर भरत (Srikar Bharat) बदली यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला आहे. याबद्दल बीसीसीआयने (BCCI) सामना सुरू असताना माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)