IND vs NZ 1st Test Day 5: नाईट वॉचमन Will Somerville याच्यासह टॉम लॅथमने भारतीय गोलंदाजांना फोडला घाम, Lunch पर्यंत यजमानांचा विकेटसाठी संघर्ष

IND vs NZ 1st Test Day 5: न्यूझीलंड सलामीवीर टॉम लॅथम आणि नाईट वॉचमन विल्यम सोमरविल यांनी कानपुर कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करून लंच-ब्रेकपर्यंत संघाला 35 षटकात 79 धावांपर्यंत मजल मारून दिली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारीने भारतीय संघाला चांगलाच त्रास दिला. टीम इंडिया विजयासाठी आणखी नऊ विकेट दूर आहेत तर किवीजना आणखी 205 धावांची गरज आहे.

विल्यम सोमरविल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 5: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कानपुर (Kanpur) येथे पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात 284 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना किवीजने वर्चस्व गाजवलं आहे. सलामीवीर टॉम लॅथम (Tom Latham) आणि नाईट वॉचमन विल्यम सोमरविलच्या (William Somerville) संयमी फलंदाजीच्या जोरावर लंचपर्यंत एक बाद 79 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. दुसरीकडे भारतीय (India) गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement