IND vs BAN, Women's World Cup 2022: यास्तिका भाटिया हिने ठोकले अर्धशतक, भारताने बांगलादेशसमोर ठेवले 230 धावांचे लक्ष्य
या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून यास्तिका भाटियाने अर्धशतक झळकावले. भारताने 50 षटकांत 7 विकेट गमावून 229 धावा केल्या.
IND W vs BAN W, World Cup 2022: यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिचे अर्धशतक आणि पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar)-स्नेह राणा यांच्या छोटेखानी योगदानाच्या जोरावर भारताने आयसीसी महिला विश्वचषकच्या (ICC Women's World Cup) 22 व्या सामन्यात 50 षटकांत 7 विकेट गमावून 229 धावा केल्या आणि बांगलादेश महिलांपुढे (Bangladesh Women) 230 धावांचे टार्गेट ठेवले आहे. संघ अडचणीत असताना यास्तिकाने 50 धावा केल्या. तर शेफाली वर्माने (Shafali Verma) 40 आणि पूजा वस्त्रकर हिने नाबाद 30 धावांचे योगदान दिले. तसेच स्नेह राणा हिने 27 धावा केल्या. दुसरीकडे, बांगलादेशी फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांवर सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)