INDW vs BANW 3rd T20 Live Streaming: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, येथे पाहु शकता तुम्ही लाइव्ह सामना

भारतीय संघाने याआधीच दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडियाला बांगलादेशचा क्लीन स्वीप करायचा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आज भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने याआधीच दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडियाला बांगलादेशचा क्लीन स्वीप करायचा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणार्‍या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण BCB च्या अधिकृत यूट्यूब आणि फेसबुक पेजवर केले जाईल. भारतातील कोणत्याही वाहिनीवर या सामन्याचे प्रसारण होणार नाही. याशिवाय, तुम्ही Fancode वर सामने देखील पाहु शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement