ENG vs AUS 1st T20I Toss Update: पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंडच्या बाजूने, कांगारुला फलंदाजीसाठी केले अमंत्रित
इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी आधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श कडे आहे.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पहिला टी-20 सामना साउथॅम्प्टनच्या द रोझ बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडने पहिल्या टी-20 साठी आधीच प्लेइंग 11 ची घोषणा केली. या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श कडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (कर्णधार/विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपले
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)