IND vs SL, Asia Cup 2023 Final Live Update: अवघ्या 50 धावांत श्रीलंकेचा सर्व संघ तंबूत परतला, सिराजने घेतल्या सहा विकेट

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला.

IND vs SL, Asia Cup 2023 Final Live Update: अवघ्या 50 धावांत श्रीलंकेचा सर्व संघ तंबूत परतला, सिराजने घेतल्या सहा विकेट

टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील आशिया कपचा अंतिम सामना (Asia Cup 2023 Final) आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांचे लक्ष जेतेपदाकडे लागले आहे. यजमानपदाचा लाभ श्रीलंकेच्या संघाला मिळणार आहे. सुपर 4 मध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना हरला होता. टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येकी एकच सामना गमावला आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकांत केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाच्या वतीने मोहम्मद सिराजने प्राणघातक गोलंदाजी करत सहा गडी बाद केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 51 धावा करायच्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).