Rajasthan Beat Delhi: रोमहर्षक सामन्यात राजस्थानने नोंदवला सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी केला पराभव
आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानने हा सामना 12 धावांनी जिंकला आहे. 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकात 5 गडी गमावून 173 धावाच करू शकला.
RR vs DC, IPL 2024 9th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024), आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानने हा सामना 12 धावांनी जिंकला आहे. 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकात 5 गडी गमावून 173 धावाच करू शकला. तत्तपुर्वी, दिल्लीने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना राजस्थानने दिल्लीसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात रियान परागने दमदार कामगिरी केली आहे. शेवटच्या षटकात या फलंदाजाने एनरिक नॉर्खियाला लक्ष्य केले आणि 25 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने या सामन्यात 14 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. याशिवाय स्टब्सने 23 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
Match 9. Rajasthan Royals Won by 12 Run(s) https://t.co/gSsTvJfhY3 #TATAIPL #IPL2024 #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 28, 2024 11:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

