कसोटीत एका डावात 10 विकेट्स घेणारा ‘विश्वविक्रमवीर’ Ajaz Patel चे औदार्य, हॉस्पिटलमध्ये चॅरिटीसाठी आपल्या ‘परफेक्ट 10’ जर्सीचा करतोय लिलाव

एजाज पटेल त्याच्या ‘Perfect 10’ जर्सीचा लिलाव करत असून यातील सर्व रक्कम StarShip Foundation-न्यूझीलंडच्या राष्ट्रीय मुलांच्या रुग्णालयाच्या स्टारशिप रेडिओलॉजी विभागाला दिली जाईल. विशेष म्हणजे भारताविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एजाजने परिधान केलेल्या जर्सीवर न्यूझीलंडच्या कसोटी संघातील सर्व सदस्यांचे ऑटोग्राफ आणि सामन्याचा स्कोअरकार्ड तयार केला आहे.

एजाज पटेलच्या ‘परफेक्ट 10’ जर्सीचा लिलाव (Photo Credit: Instagram)

Ajaz Patel Auctions ‘Perfect 10’ Jersey: न्यूझीलंडचा (New Zealand) फिरकी गोलंदाज एजाज पटेल (Ajaz Patel) भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यादरम्यान परिधान केलेल्या जर्सीचा लिलाव करत आहे. लिलावातून मिळणारी रक्कम स्टारशिप चिल्ड्रन हॉस्पिटलला दान करण्यात येणार असल्याचे पटेल यांनी सांगितले आहे. डिसेंबर 2020 मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पटेल यांनी हा शर्ट परिधान केला होता. या सामन्यात एजाजने सर्व 10 विकेट्स घेऊन इतिहास घडवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajaz Patel (@ajazpatel)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now