ICC Women's T20 World Cup 2024: महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार पाकिस्तानशी लढत
महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत प्रत्येक संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
India Women's National Cricket Team Schedule: आयसीसीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक 2024 चे नवीनतम वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेची बहुप्रतिक्षित नववी आवृत्ती बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवण्यात आली आहे. आयसीसीने सांगितले की, हे सामने दुबई आणि शारजाहमध्ये खेळवले जातील. 2020 च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान 6 ऑक्टोबरला दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. 2016 चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंडसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला ब गटात ठेवण्यात आले आहे.
श्रीलंका आणि स्कॉटलंड या वर्षाच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले. महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत प्रत्येक संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे तर उपांत्य फेरी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धेपूर्वी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 10 सराव सामने खेळवले जातील. (हेही वाचा: England Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या क्रिकेट संघाची घोषणा; दोन्ही फॉरमॅटसाठी असणार वेगवेगळे कर्णधार)
महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)