ICC T20 World Cup India Schedule: रविवारी पाकिस्तानशी भिडणार भारत; जाणून घ्या संपूर्ण स्पर्धेतील टीम इंडियाचे वेळापत्रक
आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 ला आता फक्त 1 दिवस बाकी आहे. रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी हे दोन संघ मेलबर्नमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला गतवर्षीचा विजेता आणि यजमान देश ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघाच्या सामन्यांमध्ये खूप फरक आहे, टीम इंडियाचे सामने काही दिवसांच्या फरकाने होणार आहेत. जाणून घ्या स्पर्धेतील भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक.
टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक आणि सामन्याच्या वेळा-
23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान: दुपारी 1.30 वाजता
27 ऑक्टोबर- भारत विरुद्ध नेदरलँड: दुपारी 12.30
30 ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: संध्याकाळी 4.30
2 नोव्हेंबर- भारत विरुद्ध बांगलादेश: दुपारी 1.30
6 नोव्हेंबर- भारत विरुद्ध झिंबाब्वे: दुपारी 1.30 वाजता
दरम्यान, विश्वचषक 2022 ची पहिली फेरी म्हणजेच पात्रता फेरी खेळली जात आहे. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करतील. भारतीय संघ ज्या गटात आहे, त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)