ICC Rankings: श्रेयस अय्यर याची T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप, विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर; पाहा संपूर्ण रँकिंग

ICC T20I Rankings: श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये 204 धावा करणारा श्रेयस अय्यरला आयसीसी क्रमवारीत 27 स्थानांचा फायदा झाला असून त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल 20 मध्ये झेप घेतली आहे. तर टॉप 10 मध्ये केएल राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. तसेच 10व्या स्थानावर असलेला विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्ध संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर बसल्यामुळे 15 व्या क्रमांकावर घसरला आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

ICC Rankings: माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टी-20 मालिकेतून बाहेर बसल्यानंतर आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीतील (ICC T20I Rankings) टॉप-10 खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला, तर कर्णधार रोहित शर्माही 2 स्थानांनी 13 व्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, मालिकेत जबरदस्त कामगिरी केलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाजांच्या T20I क्रमवारीत 27 स्थानांक झेप घेऊन 18व्या स्थानावर पोहोचला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now