ICC Rankings: भारताविरुद्ध मालिकेपूर्वी अकील होसेन, जेसन होल्डर यांची T20 खेळाडूंच्या क्रमवारीत मोठी झेप
ICC Rankings: भारत दौऱ्यावर मालिकेपूर्वी इंग्लंडविरुद्ध 3-2 विजयानंतर वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकीपटू अकेल होसेन आणि वेगवान गोलंदाज जेसन होल्डर यांनी आयसीसी पुरुष टी-20 खेळाडू क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारी गाठली आहे. तर इंग्लंडसाठी विंडीज दौऱ्यावर सर्वाधिक धावा मोईन अली अष्टपैलू यादीत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.
भारत दौऱ्यावर डावखुरा फिरकीपटू अकील होसेन (Akeal Hosein) आणि वेगवान गोलंदाज जेसन होल्डर (Jason Holder) यांनी आयसीसी पुरुष टी-20 खेळाडू क्रमवारीत (ICC Men's T20I Rankings) कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारी गाठली आहे. इंग्लंड मालिकेनंतर होसेन 15 स्थानांनी झेप घेऊन 18 वा क्रमांक गाठला आहे तर अष्टपैलू आणि माजी कर्णधार होल्डरने 20 रेटिंग गुणांच्या मोठ्या वाढीसह तीन स्थानांनी झेप घेऊन 23व्या स्थानावर प्रगती केली आहे.
Big gains for England's Moeen Ali in the latest update of the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings for all-rounders 💪
More details 👉 https://t.co/s1pyiOGe63 pic.twitter.com/Q10xJcuEcI
— ICC (@ICC) February 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2022 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

