ICC Bans Transgender Cricketers: आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी; खेळाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय

आयसीसीच्या निवेदनानुसार आता ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत.

ICC

तब्बल 9 महिन्यांच्या सल्लामसलत प्रक्रियेनंतर आयसीसीने आंतरराष्ट्रीय खेळासाठी नवीन लिंग पात्रता नियमांना मान्यता दिली आहे. आयसीसीच्या निवेदनानुसार आता ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. म्हणजेच आयसीसीने ट्रान्सजेंडर क्रिकेटर्सवर बंदी घातली आहे. हे नवीन धोरण महिलांच्या खेळाच्या अखंडतेचे संरक्षण, सुरक्षा, निष्पक्षता आणि समावेशन या तत्त्वांवर आधारित आहे. याचा अर्थ, यापुढे एखादा पुरुष लिंग परिवर्तन करून स्त्री झाला असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही. आयसीसीच्या मते, यासाठी त्याने कोणतीही शस्त्रक्रिया किंवा लिंग पुनर्नियुक्ती उपचार घेतले असले तरी तो आंतरराष्ट्रीय महिला खेळात सहभागी होण्यास पात्र असणार नाही. (हेही वाचा: Big Rule Change In Cricket: वनडे आणि T20 सामन्यात आयसीसीचा स्टॉप क्लॉकचा नवा नियम, षटकांदरम्यानचा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)