KL Rahul: 'मी फिट होतो पण...', दुखापतीने त्रस्त असलेल्या चाहत्यांसाठी केएल राहुलची भावनिक पोस्ट

केएल राहुलने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांने त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आणि सांगितले की त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा सामने चुकवणे किती कठीण होत आहे.

KL Rahul (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया (Team India) सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध (WI) टी-20 मालिका खेळत असून त्यानंतर लवकरच झिम्बाब्वे दौराही होणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, मात्र केएल राहुल (KL Rahul) फिटनेसमुळे बाहेर पडल्याने चाहते नाराज आहेत. केएल राहुलने फेब्रुवारीपासून टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही, आयपीएलनंतरही मालिकेच्या आधी तो जखमी झाला किंवा कोरोना झाला. या चिंतेदरम्यान आता केएल राहुलने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांने त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आणि सांगितले की त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा सामने चुकवणे किती कठीण होत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement