Asia Cup 2022: हाँगकाँगच्या खेळाडू टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये; आवडत्या खेळाडूंसोबत घेतले फोटो (Watch Video)
हाँगकाँगचा संघ भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर हाँगकाँगचा संघ टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला, जिथे संघाच्या खेळाडूंनी आपल्या आवडत्या खेळाडूंसोबत फोटोसाठी पोज दिली आणि ऑटोग्राफही घेतले. हाँगकाँगचा संघ भारतीय ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, राहुल द्रविड हाँगकाँगच्या खेळाडूंशी बोलताना दिसत आहेत. हाँगकाँग संघात भारत आणि पाकिस्तान वंशाचे खेळाडू आहेत, जे हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करतात. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “लक्षात ठेवण्यासारखे संभाषण, आठवणी जपण्यासाठी आणि त्यातून शिकण्यासाठी! हाँगकाँग संघाची भारतीय ड्रेसिंग रुमला भेट.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)