Hardik Pandya Catch Video: हार्दिक पांड्याची 27 मीटर धाव अन् घेतला आश्चर्यकारक झेल, विश्वास बसणे कठीण; पाहा व्हिडिओ
हा झेल टिपण्यासाठी हार्दिक पंड्या 27 मीटर धावला बांगलादेशच्या डावाच्या 14व्या षटकात वरूण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता, या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बांगलादेशचा फलंदाज रिशाद हुसेनने या चेंडूवर एरियल स्वीप केला, हा चेंडू मिड-विकेटच्या दिशेने गेला.
IND vs BAN 2nd T20I: भारत आणि बांगलादेशचे (IND vs BAN) संघ बुधवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांची स्फोटक खेळी पाहायला मिळाली, तर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आश्चर्यकारक झेल घेतला. हा झेल टिपण्यासाठी हार्दिक पंड्या 27 मीटर धावला बांगलादेशच्या डावाच्या 14व्या षटकात वरूण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता, या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बांगलादेशचा फलंदाज रिशाद हुसेनने या चेंडूवर एरियल स्वीप केला, हा चेंडू मिड-विकेटच्या दिशेने गेला. हा झेल टिपण्यासाठी हार्दिक पांड्या डाव्या बाजूने धावला. त्याने एक लांब मैदान कव्हर केले आणि सुमारे 27 मीटर धावला आणि डायव्हिंग करून झेल घेतला. हा झेल घेताना हार्दिक पांड्या जमिनीवर पडला, मात्र त्याने शरीराचा समतोल साधत हा झेल जमिनीवर पडू दिला नाही.