Hardik Pandya Out of Afghanistan T20 Series: हार्दिक पांड्या अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून बाहेर, थेट आयपीएल 2024 मध्ये दिसण्याची शक्यता
हार्दिक पांड्या आता अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर आहे. तसेच तो आयपीएल 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत फिट असेल अशी माहिती मिळत आहे.
IND vs AFG T20 Series: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषक 2023 दरम्यान दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पुनरागमनाची चर्चा वाढत होती. दरम्यान, काही अपडेट्स येत होते की तो आयपीएल 2024 मधून देखील बाहेर पडेल तर काही अहवाल सांगत होते की तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वी फिट होईल. पण आता ताज्या मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या आता अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर आहे. तसेच तो आयपीएल 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत फिट असेल. उल्लेखनीय आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने फॉलो थ्रूमध्ये पाय फिरवला होता. यानंतर त्याच्या घोट्यात दुखापत झाली. (हे देखील वाचा: Babar Azam Trolled Hard: ऑस्ट्रेलिया मालिकेत बाबर अपयशी, तीन डाव आणि 36 धावा, चाहत्यांनी केल ट्रोल, पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)