Hardik Pandya च्या नेतृत्वाखालील Gujarat Titans ने आपल्या नवीन Jersey चे केले अनावरण, करण्यात आला फक्त एक बदल (See Photo)
गुजरात टायटन्सने गेल्या वर्षीपासूनच आयपीएलला सुरुवात केली होती आणि पहिल्याच हंगामात संघाने विजेतेपद पटकावले.
Gujarat Titans Jersey: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आपल्या नवीन जर्सीचे (New Jersey) अनावरण केले आहे. टीमने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर नवीन जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. गुजरात टायटन्सने गेल्या वर्षीपासूनच आयपीएलला सुरुवात केली होती आणि पहिल्याच हंगामात संघाने विजेतेपद पटकावले. दरम्यान, हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेल्या गुजरात टायटन्सची जर्सी यंदाही गतवर्षी सारखीच असेल पण त्यात फक्त एक बदल करण्यात आला आहे. नवीन जर्सीमध्ये एका स्टारचा समावेश करण्यात आला आहे, जो खेळाडूंच्या छातीवर असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)