Happy Birthday Ishant Sharma: इशांत शर्मा 36 वर्षांचा झाला, BCCI ने स्टार फास्ट बॉलरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा आज 2 सप्टेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. इशांत शर्माने 100 हून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा आज 2 सप्टेंबर रोजी आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. इशांत शर्माने 100 हून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि रेड-बॉल क्रिकेटच्या स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. याशिवाय त्याने टीम इंडियासोबत चॅम्पियन ट्रॉफी 2013ही जिंकली होती. इशांतने 105 सामन्यांच्या 111 डावांमध्ये 32.41 च्या सरासरीने 311 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 80 एकदिवसीय सामन्यांच्या 78 डावांमध्ये 30.97 च्या सरासरीने 115 विकेट्स घेतल्या आहेत. तर T20 मध्ये त्याने 14 T20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे इशांतला त्याच्या 36 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)