Hamza Saleem Dar ने चौकार आणि षटकार मारत खेळली विक्रमी खेळी, 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा (Watch Video)

स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट मालिकेत हमजाची ही झंझावाती खेळी झाली आहे. या खेळीमुळे त्याने T10 क्रिकेट फॉरमॅटमधील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही केला आहे. युरोपियन क्रिकेट मालिकेत मंगळवारी (5 डिसेंबर) कॅटालुनिया जग्वार आणि सोहल हॉस्पिटल यांच्यात सामना झाला.

Hamza Saleem Dar Record Knock: क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने अप्रतिम खेळी खेळली आहे. हमजा सलीम दार (Hamza Saleem Dar) असे या फलंदाजाचे नाव आहे. हमजाने केवळ 43 चेंडूत 193 धावा केल्या आहेत. येथे त्याने 449 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर त्याला 4 पेक्षा जास्त धावा मिळाल्या. स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट मालिकेत हमजाची ही झंझावाती खेळी झाली आहे. या खेळीमुळे त्याने T10 क्रिकेट फॉरमॅटमधील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही केला आहे. युरोपियन क्रिकेट मालिकेत मंगळवारी (5 डिसेंबर) कॅटालुनिया जग्वार आणि सोहल हॉस्पिटल यांच्यात सामना झाला. येथे कॅटालोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा फलंदाज हमजाच्या या विनाशकारी खेळीमुळे त्यांनी अवघ्या 10 षटकांत 257 धावा केल्या. येथे विशेष गोष्ट म्हणजे हमजाने संपूर्ण संघाच्या एकूण स्कोअरपैकी 75% धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs SA T20 Series: टी-20 मालिकेसाठी 'या' पाच भारतीय खेळाडूंवर राहणार नजर, दक्षिण आफ्रिकेतील उसळत्या खेळपट्टीवर होणार खरी परीक्षा)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement