आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आजपासून सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे (ENG vs NZ) संघ एकमेकांशी झुंजत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन संघ 2019 च्या अंतिम फेरीत आमनेसामने आले ज्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. अशा परिस्थितीत या सामन्यात चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे तर जो रूटने या विश्वचषकातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. इंग्लंडचा स्कोर 189/5
Matt Henry the star!
Gets England's Jos Buttler for 43 in 42 balls - England 188/5 now. pic.twitter.com/uKEJvjInIi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)