DC-W vs GG-W 20th Match Live Score Update: गुजरातने दिल्लीसमोर ठेवले 127 धावांचे सोपे लक्ष्य, मॅरिझान कॅप आणि मिन्नू मणी यांची घातक गोलंदाजी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून भारती फुलमलीने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.

महिला प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या सत्रात दररोज रोमांचक सामने होत आहेत. आता लीगचा एकच सामना शिल्लक आहे. आज या मोसमातील 20 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. यानंतर एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. दरम्यान, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 126 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून भारती फुलमलीने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखा पांडे, मारिजाने कॅप आणि मिन्नू मणी यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 127 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement