Gujarat Giants WPL 2025: गुजरात जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूकडे संघाची धुरा

लीगच्या सुरुवातीपासूनच गार्डनर गुजरात संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने गेल्या दोन हंगामात 324 धावा केल्या आणि 17 विकेट्स घेत चेंडूनेही आपले कौशल्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या गार्डनरला दोन वेळा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळाला आहे.

Ashleign Gardner (Photo Credit - X)

WPL 2025: महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू अ‍ॅशले गार्डनर (Ashleign Gardner) हिला गुजरात जायंट्सची (Gujarat Giants) नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तिने देशबांधव बेथ मुनी हिच्या जागी नवीन कर्णधार म्हणून जागा घेतली आहे. लीगच्या सुरुवातीपासूनच गार्डनर गुजरात संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिने गेल्या दोन हंगामात 324 धावा केल्या आणि 17 विकेट्स घेत चेंडूनेही आपले कौशल्य दाखवले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या खेळाडूंपैकी एक असलेल्या गार्डनरला दोन वेळा बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळाला आहे. तिच्या उत्कृष्ट कामगिरीने, तिने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांगारू संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकात ती प्लेअर ऑफ द टूर्नामेंट देखील होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement