Glenn Phillips Catch Video: ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा केला चमत्कार, हवेत उडून घेतला एक अद्भुत झेल; येथे पाहा व्हिडिओ
अंतिम सामन्यात, ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा आपले क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले आणि शुभमन गिलचा एक शानदार झेल घेतला.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (ICC Chmapions Trophy 2025 Final) आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, या स्पर्धेपूर्वीही ग्लेन फिलिप्सने काही शानदार झेल घेतले होते, परंतु या स्पर्धेत त्याने विराट कोहलीचा झेल घेऊन खळबळ उडवून दिली. आता अंतिम सामन्यात, ग्लेन फिलिप्सने पुन्हा एकदा आपले क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवले आणि शुभमन गिलचा एक शानदार झेल घेतला.
Flying man does it again 😱
What a catch by Glenn Phillips 🫡#INDvsNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/CXlmPIJpfo
— 𝐊𝐀𝐑𝐍𝐀 🏹🌞🇮🇳 (@Suryaputhra07) March 9, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 5369 05:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

