IPL 2024 पूर्वी Gautam Gambhir ने तिरुपती बालाजी मंदिराला दिली भेट, घेतले दर्शन (Watch Video)

गौतम गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले आहे. तो पुन्हा एकदा या संघात सामील होईल आणि त्याच्या यशासाठी रणनीती तयार करेल.

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग सीझन 17 सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत, सर्व संघांनी सराव सुरू केला आहे. केकेआर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपल्या संघात सामील होण्यापूर्वी पत्नीसह तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. गौतम गंभीर याआधी लखनौ सुपर जायंट्सचा 2 सीझनसाठी मेंटर होता, पण या सीझनसाठी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून काम करेल. क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी राजकारणही सोडले असून, यावेळी ते लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. गौतम गंभीरने आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवले आहे. तो पुन्हा एकदा या संघात सामील होईल आणि त्याच्या यशासाठी रणनीती तयार करेल. तो लवकरच केकेआर संघात सामील होणार आहे. (हे देखील वाचा: WPL 2024 Point Table: हरमनप्रीत कौरचे तुफान, गुजरातला पराभूत करुन प्लेऑफमध्ये मिळवले स्थान, येथे पाहा पॉइंट टेबल)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now