Happy Birthday Gautam Gambhir: गौतम गंभीर 43 वा वाढदिवस, बीसीसीआयकडून पोस्टद्वारे वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि माजी खेळाडू गौतम गंभीर यांचा आज 43 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त गौतम गंभीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Happy Birthday Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) आज त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. या स्टार खेळाडूने टीम इंडियाला (IND) दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. 2007 मध्ये टी 20 आणि 2011 मध्ये ओडीआय विश्वचषक जिंकून दिला आहे. गौतम गंभीर त्याच्या कारकीर्दीत स्फोटक फलंदाजीसाठी आणि क्रिकेटच्या सखोल अभ्यासासाठी ओळखला जातो. याशिवाय, गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला दोनदा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. दरम्यान, त्याच्या वाढदिवशी बीसीसीआयने त्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. क्रीकेटमधील त्याच्या योगदानासाठी त्याचे अभिनंदन केले आहे.
बीसीसीआयने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement