Gautam Gambhir COVID-19 Positive: माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरला कोरोनाची लागण, सौम्य लक्षणे दिसल्यानंतर केली टेस्ट

टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे. गंभीर पूर्व दिल्लीचे लोकसभेचे खासदार आहेत. याशिवाय तो लखनौ सुपरजायंट्स या नवीन आयपीएल संघाचा मार्गदर्शक देखील आहे. 2018 मध्ये गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 54 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने खेळले. 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.

गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

टीम इंडियाचा (Team India) माजी सलामीवीर आणि भाजप (BJP) नेता गौतम गंभीरला (Gautam Gambhir) कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. 40 वर्षीय गंभीरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement