Yusuf Pathan Politics: माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार, TMC ने दोन माजी क्रिकेटपटूंना दिले तिकिट

टीएमसीच्या तिकिटावर एक क्रिकेटर पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवू शकतो, अशी बातमी आधीच आली होती, त्यात सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) नावही होते. कोणत्याही सूत्राने युसूफ पठाणचे नाव घेतले नसले तरी. आता पक्षाने बेहरामपूरमधून अधिकृतपणे तिकिट दिले आहे.

Photo Credit - X

भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (Yusuf Pathan) लोकसभा निवडणूक लढवणार आहे. तृणमूल काँग्रेसने त्यांना बेरहामपूर मतदारसंघातून तिकिट दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाने क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना निवडणुकीत उतरवले आहे. टीएमसीच्या तिकिटावर एक क्रिकेटर पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवू शकतो, अशी बातमी आधीच आली होती, त्यात सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) नावही होते. कोणत्याही सूत्राने युसूफ पठाणचे नाव घेतले नसले तरी. आता पक्षाने बेहरामपूरमधून अधिकृतपणे तिकिट दिले आहे. युसूफ पठाण यांच्याशिवाय तृणमूल काँग्रेसने आणखी एका माजी क्रिकेटपटूला तिकिट दिले आहे. त्यांनी दुर्गापूरमधून माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना तिकिट दिले आहे. तृणमूल काँग्रेस सौरव गांगुली किंवा त्यांच्या पत्नीला तिकिट देईल अशी बातमी होती पण तसे झाले नाही. सौरव गांगुली निवडणूक लढवणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now